सभासदत्वाचे नियम

सभासदांना सूचना


सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे की, सभासदांच्या मासिक वर्गणीमध्ये वाढ झालेली आहे. सुधारीत वर्गणी खालीलप्रमाणे
  मासिक वर्गणी वार्षिक वर्गणी
१ ला वर्ग रु. २४०/- रु. २८८०/-
बालवर्ग रु. ५०/- रु. ६००/-

मासिक वर्गणी उशीरा, १५ तारखेनंतर भरल्यास यापूर्वी आकारले जाणारे वर्गणी विलंब शुल्क रद्द करण्यात येत आहे.

वर्ग विषयी माहिती


वर्ग मासिक वर्गणी वार्षिक वर्गणी अनामत मिळणारी पुस्तके
आजीव सभासद - रु. २०,०००/- रू ३००/- दोन पुस्तके/जुनी दोन नियतकालिके
पहिला वर्ग रु. २४०/- रु. २,८८०/- रु. ६००/- दोन पुस्तके/जुनी दोन नियतकालिके.
दुसरा वर्ग / तिसरा वर्ग रु. १२०/- रु. १,४४०/- रु. ६००/- एक पुस्तक /जुन एक नियतकालिक.
बाल वर्ग रू. ५०/- रू. ६००/- रू १५०/- बाल विभागातील एक पुस्तक
मासिक अंक योजना (सभासद) रु. १००/- रु. ९५०/- - २ मासिके -एक जुने एक नवीन
मासिक अंक योजना (सभासदेतर) रु. १००/- रु. १,०५०/- रु. २००/- २ मासिके - एक जुने एक नवीन
मासिक अंक व दिवाळी अंकयोजनेसहित(सभासद) - रु. ९५०/- - २ मासिके व एक दिवाळी अंक
मासिक अंक व दिवाळी अंकयोजनेसहित(सभासदेतर) - रु. १,०५०/- रू. २००/- २ मासिके व एक दिवाळी अंक

बाल विभागाच्या सभासदांना पुस्तक देवघेवीशिवाय कोणतेही अधिकार असणार नाहीत, तसेच पुस्तकांच्या व वर्गणीच्या बाबतीत सर्व जबाबदारी त्यांच्या पालकांवर राहील.नियमांप्रमाणे त्यांनाही पुस्तकावर विलंबशुल्क भरावे लागेल.


सभासदत्व रद्द :-


१. ज्या सभासदाची वर्गणी थकली असेल किंवा ज्या सभासदाने घरी नेलेली पुस्तके नियतकालिके इत्यादी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ परत केली नसतील अशा सभासदांची नावे पटावरुन कमी करण्याचा अधिकार व्यवस्थापक मंडळास राहील व त्याबद्दल पूर्वसूचना देण्याची जबाबदारी व्यवस्थापक मंडळावर असणार नाही.

२. सभासदांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक मंडळ प्रयत्नशील राहील. परंतु जर काही कारणामुळे सभासदांचे समाधान होत नसेल व त्यामुळे संबंधित सभासदांशी, संस्थेचे सेवक आणि व्यवस्थापक मंडळ सदस्यांची विनाकारण कटुता निर्माण होत असेल तर कोणतीही पूर्वसूचना न देता सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापक मंडळास राहील.

३. राजीनामा दिल्याने किंवा इतर कोणत्याही कारणाने सभासदत्व रद्द झाल्यास सभासदांकडून येणे असलेली वर्गणी, विलंब शुल्क व ग्रंथाची किंमत सभासदाच्या अनामत रक्कमेतून किंवा आगाऊ वर्गणीतून वसूल केली जाईल व त्यानंतरही बाकी राहिल्यास ती वसूल करण्याचा अधिकार व्यवस्थापक मंडळास राहील.

४. सभासदत्व रद्द करण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यत ठरावीक नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येईल.सभासदत्व रद्द करण्यासंबंधीचा अर्ज जास्तीत जास्त एक महिना अगोदर स्वीकारला जाईल व त्यानंतर पुढील महिन्यापासून सभासदांचे नाव पटावरून कमी करण्यात येईल

५. सभासदत्व रद्द करताना आपल्याजवळ पुस्तक अगर मासिक जे काही असेल ते महिना अखेरपर्यंतपरत केले पाहिजे. त्यानंतर ते परत केल्यास त्या महिन्याची पूर्ण वर्गणी द्यावी लागेल.

६. अर्ज भरुन दिल्यानंतर ज्या महिन्यापासून नाव कमी करावयाचे असेल त्या महिन्यापासून दोन महिन्यांच्या आत अनामत रक्कम परत नेली पाहिजे,त्या मुदतीत न नेल्यास अनामत रक्कम परत न करता कायमनिधित वर्ग केली जाईल.


दुर्मिळ ग्रंथ:-


१.दुर्मिळ, संग्राह्य अथवा मूल्यवान ग्रंथाबद्दल विशेष अनामत घेण्याचा अधिकार व्यवस्थापक मंडळास आहे व अशी पुस्तके देणे अथवा न देण्याचा अधिकार व्यवस्थापक मंडळास राहील. २. दुर्मिळ / विकत उपलब्ध नसलेले पुस्तक हवे असल्यास खालील प्रमाणे जादा अनामत भरावी लागेल.

प्रकाशन वर्ष कमीत कमी अनामत जास्तीत जास्त अनामत
१९३५ ते १९७० रु. ७५०/- रु.१,०००/-
१९७१ ते १९९० रु. ३००/- रु. ५००/-
१९९० च्या पुढे रु. ३००/- पुस्तकांची किंमत किंवा वाचनालय अनामत यापैकी जे अधिक



सर्वसाधारण नियम : -


१. पुस्तकांची किंमत जमा अनामत रकमेपेक्षा अधिक असल्यास अनामत रकमेतील फरक भरुनच असे पुस्तक नेता येईल. पुस्तक जमा केल्यावर मूळ पावती सादर करुन जादा अनामत परत घेता येईल. अनामत परत घेते वेळी अनामत रक्कमेची पावती हरवली असल्यास तसे अर्जासोबत लिहून द्यावे. पावती हरवली असल्यास ५रु. जादा आकार द्यावा लागेल. त्याचप्रमाणे स्वत: अनामत नेणे शक्य नसल्यास स्वत:च्या सहीने दुसराच्याबरोबर अधिकारपत्र पाठवावे तरच अनामत रक्कम देता येईल.

२. वर्गणी महिन्याच्या १५ तारखेपर्यत जमा न झाल्यास वर्गणीची रक्कम अनामत रकमेतून तात्पुरती वजा करुन अनामतीच्या शिल्लक रकमे एवढयाच किंमतीचे पुस्तक नेता येईल.

३. पुस्तके, नियतकालिके इत्यादींच्या देवघेवीची व वाचनालयाची वेळ व्यवस्थापक मंडळ ठरवील त्याप्रमाणे राहील. अनपेक्षित घटनेनिमित्त व योग्य कारणास्तव कार्याध्यक्ष / प्रमुख कार्यवाह किंवा कार्यवाह संस्थेचे कामकाज बंद ठेवू शकतील.

४. वार्षिक ग्रंथतपासणीनिमित्त वाचनालय जास्तीत जास्त १० दिवस बंद ठेवले जाईल.

५. सभासदाकडून पुस्तक हरविले गेल्यास / खराब झाल्यास / फाटल्यास त्या पुस्तकाची त्या वेळची बाजारातील संपूर्ण किंमत भरावी लागेल किंवा पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध असल्यास ते हरवलेल्या पुस्तक बदली द्यावे लागेल. दुर्मिळ व बाजारात उपलब्ध नसलेले पुस्तक हरवले गेल्यास त्याबद्दल योग्य ती अधिक किंमत आकारण्याचा अधिकार व्यवस्थापनास राहील (कृपया नियम क्र.१२ पहाणे ) हरवलेल्या पुस्तकाची किंमत वसूल होईपर्यंत जादा वर्गणी (विलंब शुल्क)आकारण्यात येईल.

६. वाचावयास नेलेले पुस्तक कोणत्याही प्रकारे खराब झालेले आढळल्यास पुस्तकाची पूर्ण किंमत वसूल करण्यात येईल.


पुस्तकाच्या विलंबशुल्कासंबधीचे नियम:-


१. विलंब शुल्कासंबधीचे नियम सर्व वर्गाच्या सभासदांना व सर्व विभागातील पुस्तकांना व नियतकालिकांना लागू आहेत. विलंब शुल्क प्रत्येक पुस्तकावर व नियतकालिकावर प्रतिदिनी रु. २/- प्रमाणे आकारण्यात येईल.

२. पुस्तक नेल्यापासून २० दिवसानंतर विलंब शुल्क आकारले जाईल. परंतु ज्या पुस्तकांना आधीपासून अग्रहक्क असेल त्या पुस्तकांना २० दिवसानंतर विलंबशुल्क आकारले जाईल.

३. पुस्तक परत करण्याचे दिवशी संपूर्ण किंवा अर्धा दिवस अनपेक्षित सुट्टी असल्यास व त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवशी पुस्तक जमा केल्यास सुट्टीच्या दिवसाचे विलंबशुल्क आकारण्यात येणार नाही. (उदा. बुधवार हा पुस्तक परत करण्याचा दिवस असेल आणि गुरुवार व शुक्रवार सुट्टी असेल तर शनिवारी फक्त एका दिवसाची जादा वर्गणी आकारली जाईल.) मात्र त्यानंतर हया सुट्टीच्या दिवसाची पण जादा वर्गणी आकारली जाईल.

४. सभासदाने २ महिन्यांमध्ये पुस्तक परत न केल्यास अथवा त्याबद्दल काही लेखी न कळविल्यास सभासदांच्या नावावर असलेले पुस्तक हरवले आहे असे गृहीत धरुन सभासदांकडून पुस्तकाची संपूर्ण किंमत अधिक येणे असलेले विलंब शुल्क वसूल करण्यात येईल.